मेडिकल असोसिएशनच्यावतीने १ जुलै डॉक्टर डे निमित्ताने संगीत सोहळ्याचे आयोजन

 

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (शाखा आयएमए) च्या वतीने १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. जातो यावर्षी केमए आर्ट सर्कलच्या वतीने संगीत सोहळ्याचे आयोजन १ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे केले असल्याचे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावर्षीचा हा २० वा ‘डॉक्टर डे’ असून हिंदी चित्रपटातील प्रख्यात संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या संगीतावर आधारित ‘मेरे दिल मे आज क्या है’ या संगीत नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत – नृत्य सोहळ्यासाठी स्वतः संगीतकार श्री प्यारेलालजी शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

२०२३- २४ वर्ष हे मेडिकल असोसिएशनचे शताब्दी वर्ष असणार आहे. त्यासाठी पुढील चार वर्षे वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याची सुरुवातही या एक जुलैच्या डॉक्टर्स डे संगीत सोहळ्याने करीत आहोत, असे डॉ.उद्धव पाटील यांनी सांगितले. डॉक्टरांचा रोजचा दिवस हा अतिशय व्यस्त असतो. त्यामुळे त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गेली वीस वर्षे मेडिकल असोसिएशनच्या आर्ट सर्कलमार्फत विविध सांगीतिक कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये डॉक्टर कलाकार उस्फूर्तपणे सहभाग घेतात.यावर्षीचा संगीत सोहळाही रंगतदार होणार असल्याचे डॉ.अमर आडके यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला सचिव डॉ. आशा जाधव,डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ.ए. बी. पाटील, डॉ.रविंद्र शिंदे,डॉ.संजय घोटणे,डॉ. अजित चांदेलकर, डॉ. सोपान चौगुले,डॉ. प्रिया शहा,डॉ.पी. एम. चौगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!