
कोल्हापूर: गेली काही वर्ष चर्चेत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा अखेर न्यायालयीन स्तरावर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण, मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाज बांधवांना चांगली संधी मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय असून, निर्णायक लढाई जिंकल्याचे समाधान आहे. विरोधी पक्षांनी या मुद्दयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच मराठा आरक्षणाच्या लढयासाठी ज्यांनी बलिदान दिलं, त्या सर्वांच्या बलिदानाचं हे यश आहे, अशी प्रतिक्रीया माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली आणि मा.उच्च न्यायालयाने मराठा समाजाची परिस्थिती समजून घेऊन न्याय दिला, याबद्दल राज्य सरकार आणि न्यायव्यवस्था यांचे आभार मानत असल्याचे माजी खासदार महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
Leave a Reply