सनातन संस्थेवर लवकर बंदी घाला: मुक्ता दाभोलकर

 

कोल्हापूर – सनातन संस्थेवरScreenshot_2016-01-05-23-47-57 अजूनदेखील बंदी का घातलेली नाही, असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतचा खुलासा देण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे. कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी त्या बोलत होत्या. समीर गायकवाड या सनातनच्या साधकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरातून सनातन संस्थेवर बंदीची मागणी झाली होती.

दरम्यान ३० डिसेंबरला राजाराम पुरी पोलिस ठाण्यामध्ये सनातन संस्थेने पाठवलेले पत्र हे धमकीचेच असून पोलिस या बाबत उदासीन का? तसेच इतक्या खुले पणाने पाठवलेल्या या पत्रामध्ये साक्षीदारांची काळजी घ्या, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. ही धमकीच असल्याचे मुक्ता दाभोलकरांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!