कोल्हापूर
: विश्व हींदू परिषद – बजरंग दल यांच्यावतीने अमरनाथसह बुढा अमरनाथ या दोन्ही धार्मिक संयुक्त यात्राना मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील भक्तांसाठी पुणे शहरापासून परत पुणे शहरापर्यंत ही सहल अवघ्या सात हजार रुपये इतक्या कमी खर्चात करता येणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष प्रसाद मुजुमदार आणि जिल्हा मंत्री अँड.रणजीतसिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हिंदूंचे श्रद्धा स्थान असणाऱ्या अमरनाथसह ही संयुक्त बुढा अमरनाथ यात्रा आता लोकप्रिय झाली आहे असून किमान एक लाख भाविक यात भारतामधून सहभागी होतात. सन 1986 दरम्यान अतिरेक्यांचा प्रचंड प्रभाव असताना पाकिस्तान सीमेचे लगतच्या राजुरी तालुक्यातील बंडी या गावांमध्ये असणाऱ्या या बुढा अमरनाथ मंदिरात विश्व हिंदू परिषदेने ही यात्रा सूत्रबद्धपणे सुरू केली होती.
सन 2005 पासून ही यात्रा नियमितपणे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने सुरु आहे.इतर व्यवसायिक ट्रॅव्हल कंपन्यांच्या तुलनेत अगदी नाममात्र शुल्कामध्ये सर्व नोंदणी याची व्यवस्था व रेल्वे, लक्झरी प्रवासाचे यात नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळेच याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रातून पहिली तुकडी पुण्यातून रवाना होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी सत्वर स्थानिक विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल कार्यालय किंवा कोल्हापुरात कमल कुंज , खासबाग रिक्षा स्टॉप जवळ मंगळवार पेठ येथील कार्यालयात ( 9823044282 )आणि बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संघटक, लहुजी धोत्रे ( 9850611708) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्याची विश्व हिंदू परिषद ,बजरगं दल, मातृवंदना दुर्गाशक्तीच्या कार्यकारिणीची नविन निवड प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर शौर्य वर्गाचे आणि संस्कार वर्गाचे तालुकानिहाय आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहमंत्री पदी म्हणून शांतीभाई लिबाणी व राजेंद्र मकोटे यांची नियुक्ती केल्याची घोषणा जिल्हा मंत्री अँड. रणजीत सिंह घाटगे यांनी यावेळी केली.तालुका व गाव पातळीवर विहीपसह सलंग्न संस्थामघ्ये सक्रीय होऊ ईच्छीणारे युवक युवतीसह नागरीकानी संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात आले.

Leave a Reply