
कोल्हापूर : प्रती पंढरपूर नंदवाळकडे जाणाऱ्या जाणारे पंचक्रोशीतील वारकरी बंधू-भगिनी कोल्हापुरात विठ्ठल मंदिरात मंगळ पेठ येथे दाखल झाले आणि विठू माऊलीचा गजर करत नगर प्रदक्षिणेस सुरुवात झाली. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात कोल्हापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर माधवी गवंडी ,भगिनी मंचच्या वैशाली शिरसागर नगरसेविका संगिता घोरपडे आदींनी पालखीचे पूजन केले. या नतंर बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड मार्गे ही दींडी पालखी भवानी मंडप येथे आली.तिथे उभे रिंगण माऊलीच्या गजरात संपन्न झाले. यानंतर मिरजकर तिकटी मंगळ पेठ मार्गे टिंबर मार्कैट येथील सासने ईस्टेट रात्रीच्या मुक्कामी दिडी विसावली.येथे दींडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज यांचे किर्तन व संत अभ्यासक एम.पी .पाटील सर यांचे प्रवचन झाले .सर्व भाविकांची भोजन प्रसाद व्यवस्था श्रीमती शिलावती बाबासाहेब सासणे कुंटुबियानी केली होती. नगर दिंडी वाटेवर भाजपा व्यापारी मित्र आघाडीतर्फे भवानी मंडपात तसेच टिंबर मार्केट येथे व्यवसाय बंधू यांच्यावतीने चहा लाडू तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती . मुक्काम ठीकाणी शिवाजी ऊघमनगर येथील वालावलकर हॉस्पिटल तसेच सिद्धगिरी हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .दिलीप देसाई ,अँड.राजेंद्र किंकर , संतोष कुलकर्णी सह ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार , दीपक गौड ,खजानीस राजेंद्र मकोटे , सुरेश जरग , किशोर घाडगे,सागर चव्हाण यांचेसह हुपरी , नंदवाळ गिरोली, पिराची वाडी आदी गावातील वारकरी सहभागी झाले होते.मोरेवाडी च्या संतोष रांगोळी यांच्या पवन आणि सोन्या माऊली अश्वानी तसेच दिंड्या पताका आणि तुळस घेतलेल्या वारकरी बंधूनी उत्साहाने फुगडी ,भजने बदल अवघे कोल्हापूर विठ्ठलमय करुन टाकले. शुक्रवारी सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजी पेठ मार्गे ही दिंडी सानेगुरुजी वाशीमार्गै प्रति पंढरपूर नदंवाळकडे जाणार आहे.दिंडी दरम्यान खोलखंडोबा येथे उभे तर पुईखडी येथे वाखरी प्रमाणे उभे रिंगण होणार आहे.
Leave a Reply