
कोल्हापूर :महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाची महापौर सौ.माधवी गवंडी यांनी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचेसमवेत पाहणी केली.
महापौर सौ.माधवी गवंडी यांनी समाधी स्थळाचे काम प्रगती पथावर असलेने समाधान व्यक्त केले. तसेच 10 ऑगस्ट नंतर विविध मान्यवरांची वेळ घेऊन लोकापर्ण सोहळयाची एक तारीख निश्चित केली जाईल असे सांगितले. उर्वरीत कामेही लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार यांना यावेळी देण्यात आल्या.
ठेकेदार व्ही.के.पाटील यांनी समाधी स्थळी स्टोनचे, पेव्हींगचे व लॅन्डस्केपिंगचे काम अंतीम टप्यात असून लॉनसह फरशीचे काम 31 जुलै पर्यंत पुर्ण करत असलेचे सांगितले. दि.10 ऑगस्ट 2019 पर्यंत ठरलेल्या वेळेमध्ये उर्वरीत सर्व कामे पुर्ण केली जातील. त्यानंतर आपण लोकापर्ण सोहळा आपल्या निश्चित तारखेला घेऊ शकतो असे सांगितले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या परिसरातील मंदिरावरील झाडे, झुडपे काढून त्यावर केमिकल लावून हा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना ठेकेदार यांना दिल्या. तसेच लोकार्पण सोळयासाठी गेटपर्यंत काँक्रीटकीरण करुन पार्किगसाठी कपौंडबाहेरील गटारीवर गाडयापार्किंगचे नियोजन करणेबाबतच्या सूचना आर्किटेक्चर अभिजीत जाधव यांना केल्या. तसेच ठेकेदार यांनी दर शनिवारी आपल्या कामाचा अहवाल महपौर व आयुक्त कार्यालयात देणेच्या सूचनाही दिल्या.
यावेळ नगरसेविका नगरसेवक जय पटकारे, सौ.मेहजबीन सुभेदार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस के माने, वसंतराव मुळीक, पुरा अभिलेख विभागाचे गणेश खोडके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, रियाज सुभेदार, संजय माळी, निशिकांत सरनाईक, वसंत लिगनूरकर, आदी उपस्थित होते.
Leave a Reply