मदनपल्ली : आंध्र प्रदेशातील मदनपल्ली येथे बहुजन समाजातील मराठी बांधवांनी मराठा एकिकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र दैव मंडळ, भवानी कल्याण मंडळ यांच्यावतीने मराठा स्नेहमेळावा प्रसिद्ध गंगामाई मंदिर येथे आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी आजूबाजूच्या गावातून सुमारे हजार मराठा बांधव उपस्थित राहिले होते. यावेळी सर्व मराठा बांधवांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. मराठा वक्ता प्रशांत कल्याणकर यांनी सर्व मराठा बांधवांना आपण प्रत्येक वर्षी शिवजयंती व आषाढी एकादशी सर्वजण एकत्र येऊन एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरी करण्याच आवाहन केले. यावेळी आजूबाजूच्या गावातून मराठा बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी सर्वांना मंडळाने भोजनाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा बांधव अशोक मोरे व व विलास निकम यांनी केले. उपस्थित वेंकटेश स्वामी मंदिर चे चेअरमन रेडप राव, नितीन धनवडे, प्रकाश भोसले, सिन्हा कल्याणकर, अभिजीत साळुंखे, सचिन कांबळे, विश्वजीत पाटील, आनंद मराठे, गोविंद आंबाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply