
कोल्हापूर: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी मध्ये ८५ हजार विद्यार्थी, ८ हजार कर्मचारी आणि १०५ कॉलेज असलेल्या सिंहगड संस्थेविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचा गैरसमज दूर व्हावा या उद्देशाने सिंहगड कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सिंहगड संस्था सुरळीत चालावी या हेतूने सिंहगड कृती समिती ची स्थापना केली आहे.
२५ वर्षे पूर्ण केलेल्या सिंहगड संस्थेची घोडदौड काही प्रतिस्पर्धी संस्था ना पाहवत नसल्याने जाणीपूर्वक सूडबुद्धीने, शक्य असलेल्या मार्गाने संस्थेविषयी खोटी अफवा पसरवत आहेत व गरजू विद्यार्थी आणि पालक यांची दिशाभूल होत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात डायरेक्टर पासून शिपाई पर्यंत शासकीय नियमाप्रमाणे सहावा वेतन आयोगानुसार वेतन देणारी एकमेव संस्था आहे. त्याच बरोबर महिला भगिनिसाठी ६ महिन्यांची प्रसूती रजा, टी. ए., डी. ए., पीएफ सारख्या सुविधा ही दिल्या जातात.संस्थापक यांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांचे हित हेच संस्थेचे हित या प्रमाणे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून केलेल्या प्रयत्नामुळेच संस्थेची घोडदौड चालू आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा, अद्यावत हॉस्टेल तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेक्टॉनिक, सिंहगड करंडक व सिंहगड स्पोर्ट या सारखे कार्यक्रमही दरवर्षी आयोजित केले जातात. यासोबत सगळे सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सर्व कोर्सेस पुणे युनिव्हर्सिटी, ए. आई. सी. टी. ई., एम. एस. बी. टी. ई, सोबत सलग्न व मान्यताप्राप्त असल्याने संस्थेत एडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना फ्री शिप, स्कॉलर शिप, ई.बी.सी सारख्या सुविधांचा फायदा घेता येतो.अशी माहिती राजेंद्र देशमुख यांनी दिली. ते म्हणाले”,सिंहगड संस्थेत एडमिशन घेणारा विद्यार्थी हा प्रामुख्याने मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने पालक व विद्यार्थी हे करिअर ओरिएंटेड असतात. हेच मूळ शोधून संस्थे सेंट्रल प्लेसमेंट सेल ने २६५० विद्यार्थ्यांना दर्जेदार कंपन्यांमध्ये प्लेसमेंट दिले आहे.सिंहगड संस्थेमध्ये इतके विक्रमी आणि प्रभावी प्लेसमेंट होण्यामागील मूळ कारण असे आहे की आमच्या मुलांना प्रथम वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत ट्रेनिंग प्रोग्राम, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, करूनच घेतले जातात जे बाहेर महाराष्ट्रात कोणत्याही संस्थेत घेतला जात नाही या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांची त्यांच्या एम कॅट टेस्ट घेऊन त्यांच्या विकनेस पॉईंट वर काम केले जाते अन ते स्किल इम्प्रोवमेंट करून घेतले जाते.याच बरोबर कंपन्यांचे ट्रेनर कॉलेजमध्ये बोलावून इंटरव्यू ग्रुप डिस्कशन प्रेझेंटेशन याबाबत फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग घेतले जाते याचाच परिपाक म्हणून आमचे विद्यार्थी इम्पोसेस,कॉग्निझंट,असेंचर यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये प्लेस झाले आहेत.याचाच पोटशूळ म्हणून काही प्रतिस्पर्धी संस्था कॉलेज अफवांच्या रूपाने सिंहगड संस्थेविषयी खोट्या बातम्या विद्यार्थी व पालक पर्यंत पोहचवत आहेत.परिणामी सुविधा पात्र, दर्जेदार इच्छूक विद्यार्थी व पालकांचे नुकसान होत आहे.तरी याला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला प्रा. प्रवीण लोखंडे, किरण बनसोडे,समीर तावसे,संजय पांढरे आदी उपस्थित होते.
Leave a Reply