
नाशिक : शनि शिंगणापूरमध्ये मंदिराच्या चौथर्यावर चढून महिलेनं दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता.महिलांना विरोध असणाऱ्या शनि शिंगणापूरच्या विश्वस्पपदी 2 महिलांची नियुक्ती झाली आहे. 11 सदस्यांच्या विश्वस्तमंडळात 11 पैकी 2 महिला असणार आहे. विश्वस्तपदाच्या निवडणुकीसाठी आले होते 98 अर्ज आले होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी यादीही जाहीर केली.
गेली कित्येक दशक शनी शिगणापूरमध्ये महिलांनी प्रवेश करू नये अशी प्रथा आहे. पण, या प्रथेला छेद देत एका तरुणीने थेट चौथर्यावर चढून दर्शन घेतलं. आख्या महाराष्ट्रात याचे उमटले. महिलांमधे याचा रोष पसरला आणि अवेशाने शिंगणापूरच्या चार ते पाच महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून 2 महिलांची विश्वस्तपदी निवड झाली.आणि लढा यशस्वी झाला.
Leave a Reply