
मुलुंड : येथील फोर्टिस हॉस्पिटल या महाराष्ट्रातील आघाडीच्या हेल्थकेअर सोल्यूशन देणा-या हॉस्पिटलने आज येथे जगातील सर्वात प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञान दा विन्सी Xi रोबोटिक सर्जिकल यंत्रणा स्थापित केली आहे. फोर-आर्म सर्जिकल रोबोटिक यंत्रणा युरोलॉजी,ऑन्कोलॉजी, ग्यानेकॉलॉजी, डोके व मान आणि जठर व आतड्यांसबंधीच्या शस्त्रक्रियांच्या स्पेशालिटीजसाठी वापरण्यात येईल. मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या विभागीय संचालिका डॉ. एस नारायणी,मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आणि कोलोरेक्टल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अनिल हेरूर आणि मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या युरोलॉजीचे प्रमुख डॉ. पंकज महेश्वरी यांच्या उपस्थितीत या शस्त्रक्रिया यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.डॉक्टरांना अत्यंत उपयोगी असलेली नवीन दा विन्सी Xiयंत्रणा डॉक्टरांना अगदी अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यामध्ये मदत करते आणि यामुळे आसपासच्या ऊतींना अत्यंत कमी प्रमाणात इजा होते. ही यंत्रणा कुशल सर्जन्सना जटिल शस्त्रक्रिया करताना साह्य म्हणून प्रगत तंत्रज्ञानाची सुविधा देईल. अत्यंत अचूकपणे शस्त्रक्रिया करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया यंत्रणा प्रशिक्षित सर्जन्सच्या स्पेशालाइज टीमद्वारे संचालित असेल.यंत्रणेच्या उपयुक्ततेबाबत बोलताना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या सर्जिकल ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आणि कोलोरेक्टल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अनिल हेरूर म्हणाले, ”रोबोटिक शस्त्रक्रिया यंत्रणेच्या वापराने शस्त्रक्रिया करताना त्यामधील अचूकता, व्हिज्युअलायझेशन व निपुणता वाढेल. या यंत्रणेमुळे डॉक्टर्स व रूग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. रुग्णांसाठी शस्त्रक्रियेमध्ये होणारी चीडफाड कमी होण्याची, लवकर बरे होण्याची आणि हॉस्पिटलमधील वास्तव्याचे प्रमाण कमी होण्यासह खर्च देखील कमी होण्याची खात्री मिळेल.”रूग्णांसाठी फायदे अनेक आहेत. या यंत्रणेमुळे हॉस्पिटलमध्ये राहण्याचे दिवस कमी होतात,जलदपणे रिकव्हरी होते,चीडफाडमुळे होऊ शकणा-या संसर्गाचा धोका कमी होतो, कमी प्रमाणात रक्त येते, आरोग्यदायी युतींचे जतन होते आणि शस्त्रक्रियेचे कमी व्रण राहते. या शस्त्रक्रियांचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ही शस्त्रक्रिया वेदना-मुक्त असून वेदनाशामक औषधांची गरज कमी होते. हा यंत्रणेसह हॉस्पिटलमध्ये एकाच दिवसात अनेक शस्त्रक्रिया करता येऊ शकतात.रूग्णाच्या फायद्यांबाबत बोलतानामुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या युरोलॉजीचे प्रमुख डॉ. पंकज महेश्वरी म्हणाले,”रूग्णांना त्यांच्या युरोलॉजिकल ऊती, विशेषत: युरोलॉजिकल कॅन्सर्स आणि रिकनस्ट्रक्टिव्ह क्रिया योग्य करण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करावी लागेल. यामुळे त्यांना प्रचंड लाभ होतील. या शस्त्रक्रियेमुळे कमी व्रण दिसतील आणि लैंगिक कार्याची जलदपणे रिकव्हरी होण्याची खात्री मिळते.”मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या विभागीय संचालिका डॉ. एस नारायणीम्हणाल्या, ”रोबोटिक यंत्रणा ही सर्वोत्तम निर्मिती आहे. ही यंत्रणा जटिल शस्त्रक्रिया सुलभ करण्यासह रूग्णांच्या सुरक्षिततेची अधिक खात्री देते. मला शस्त्रक्रिया केअरला नव्या उंचीवर घेऊन जाणारे हे तंत्रज्ञान मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये असल्याबाबत अत्यंत आनंद होत आहे.”
Leave a Reply