
कोल्हापूर : लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत टिपणी करून त्यांचा घोर अवमान केला. या विडंबनात्मक लिखाणामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी कलिम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी १५३ आणि २९५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा दुधाणे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. वसंत बाबर यांच्याकडे दाखल केली. या वेळी रेखा दुधाणे यांच्या समवेत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठांशी चर्चा करून आणि अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू, असे सांगितले.
या वेळी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. जयवंत निर्मळ, शहर उपाध्यक्ष श्री. संतोष पवार, श्री. शरद माळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा पवार, शहराध्यक्ष मनिषा पवार, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि श्री. किशोर घाटगे, विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
Leave a Reply