विज्ञाननिष्ठ जीवन तत्वज्ञान मांडून अवघ्या जगाला स्वामी विवेकानंदानी नवी दृष्टी दिली: सुहास लिमये

 

कोल्हापूर : समाजात भुकेल्या पोटी प्रवचन पचनी पडत नाही. तर या दरिद्रीनारायणाच्या सेवेतच धर्म – जीवनाचे मुलभूत तत्वज्ञान सामावले आहे,अशी अवघ्या जगाला भारावून टाकणारी नवी कृतीशील सहज कर्मयोगाची दृष्टी स्वामी विवेकानंदानी दिली “असे अभ्यासू मत विविध संदर्भासह सुहास लिमये यांनी व्यक्त केले. विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समिती आयोजित नारद जंयती ऊपक्रमात त्यांनी आपले विचारपुष्प गुंफले.करवीर नगर वाचन मंदिरात झालेल्या या सोहळ्यात “स्वामी विवेकानंदाचे राष्ट्र निर्माणातील योगदान” या विषयावर अभ्यासक लिमये यांनी आपले हितगुजपर मनोगत व्यक्त केले. प्रांरभी स्वागत समन्वयक अनिरुध्द कोल्हापूरे यांनी केले.मुख्य वक्ते व पाहुण्याचा परिचय सुत्र संचालक डॉ.सदानंद राजवर्धन यांनी करुन दिला. आपल्या भाषणात लिमये यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील देश – विदेशातील विविध महत्त्वाचे प्रसंग नमूद करत ,त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली विज्ञान निष्ठा कधीच सोडली नाही. ऊलट भारतीय वेंदान्तामधूनच जगाला अंतिम सत्य समजेल हे ठामपणे सांगत सेवाभावातील कर्मयोग ही विज्ञाननिष्ठपणे पटवून दिला असे प्रतिपादन केले. 

यावेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे संस्थापक सुधाकर निर्मळे आणि पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा गौरव वक्ते सुहास लिमये व रा.स्व .संघाचे विभागीय सदस्य मुंकुंद भावे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच विविध दैनिके – वृत्तवाहिन्याच्या पत्रकार – प्रतिनिधी यामध्ये शुभांगी तावरे,अक्षय थोरवत, श्रद्धा जोगळेकर,सलीम सोलापुरे,सदाशिव जाधव,शिवाजी शिंगे,बाबासाहेब खाडे, निखिल गोखले, ओंकार धर्मधिकारी, प्रमोद व्हानगुत्ते, शैलेश माने,प्रशांत आयरेकर,मालोजी केरकर यांना पुस्तक संच देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्यास डाँ.विक्रम राजाज्ञा, र्कीतीराज देसाई ,आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ पंच भारत चौगुले – ऊत्कर्ष लोमटे, सुलोचना नार्वैकर,सुनील पंडीत
,तेजस्वीनी हराळे,केदार जोशी ,वृंदा सावेकर,तेजास्विनी गायकवाड सह विविध क्षेत्रातील मान्यवर ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!