
कोल्हापूर : महानगरपालीकेच्या केएमटी विभाग हा सध्या बिकट परिस्थीतीत असून या विभागाकडे शंभर टक्के अनुदानातून नविन 75 ईलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात म्हणून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अरविंद सावंत यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेवून आजरोजी मागणी केली.
सार्वजनिक आणि सामायिक वाहतूक विद्युतीकरणास प्रोस्ताहन देण्याकरीता शासनाने हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या फेम इंडिया स्कीमचे फेज II मंजूर केले आहे. या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानातून ईलेक्ट्रिक बसेस दिल्या जाणार आहेत. यापार्श्वभुमीवर, नाम.अरविंद सावंत यांचेशी यासंदर्भात सविस्तर चर्चा करुन यामध्ये कोल्हापूरची भौगोलीक रचना, कोल्हापूर शहराची प्रदुषणाची पातळी, सध्याची केएमटीची परिस्थीती आणि या बससेवीची कोल्हापूरकरांसाठी असलेली गरज हे विस्तृतमध्ये सांगितल्याने हा प्रकल्प कोल्हापूरकरांसाठी मंजूर करण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले. तसेच, कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक बसेससह सर्व इलेक्ट्रिक वाहनांना विद्युत पुरवठा होणेच्या अनुषंगाने या योजनेमधूनच 10 चार्जींग स्टेशन्स 100 टक्के अनुदानातून देणेची मागणी केली. त्यावर ना.मंत्रीमहोदयांनी किमान 3 ते 5 चार्जींग स्टेशन्स 100 टक्के अनुदानातून उपलब्ध करुन देणेची ग्वाही दिली.
Leave a Reply