चंदुकाका सराफच्या कोल्हापूरातील सुवर्ण दालनाचे शानदार उद्घाटन

 

कोल्हापूर : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली १९२ वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या (बारामतीचे शुद्ध सोने) हीच ज्यांची ओळख आहे त्या प्रख्यात चंदूकाका सराफ आणि सन्सच्या भव्य अश्या अठराव्‍या कोल्हापूर सुवर्ण दालनाचा शुभारंभ प्रख्यात उद्योजक संजय घोडावत यांच्या शुभहस्ते दीपप्रज्‍वलन करून करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या महापौर माधवी गवंडी,माजी महापौर हसीना फरास, ऋतुराज पाटील,चंदुकाका सराफ अँड सन्सचे संचालक किशोरकुमार, जिनदत्त शहा, अतुलकुमार शहा,सिद्धार्थ शहा, सौ.संगीता शहा, सौ.नेहा शहा,सौ.अंकिता शहा,सम्‍यक शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी बोलताना संजय घोडावत यांनी कोल्हापूरकरांना साजेसे असे सुवर्ण दालन चंदुकाका यांनी साकारले असून पिढ्यांन पिढ्यांनी कमावलेला विश्वास व सचोटी यामुळे संपूर्ण राज्यभर नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार काढले. चंदुकाका सराफ यांनी समृद्धता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहरात सुरू होणारी ही अठरावी शाखा असल्याचे सांगत कोल्हापूर येथील लोक आमच्यावर विश्वास ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली.फक्त व्यवसाय न करता आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने चंदुकाका सराफ ने नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी ठेवत राबविले आहेत असे संचालक अतुल शहा यांनी सांगितले.
आमच्या सराफ पिढीने गोल्ड योजनेत २८ जुलै पर्यंत सहभागी होणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला एक ज्युपिटर स्कूटर मिळविण्याची सुवर्णसंधी ही उपलब्ध करून दिल्याचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी सांगितले. यावेळी विविध नगरसेवक,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!