
कोल्हापूर :कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापुरात सुरु असलेली सुनावणी समीर गायकवाड यांने पश्चिम महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी केली आहे उच्च न्यायालयात या संधर्भात समीर ने सादर केलेल्या अर्जावर १४ जानेवारीला सुनावणी होत आहे मात्र हि सुनावणी इतरत्र हलवू नये अशी मागणी पानसरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे मेघा पानसरे यांनी या संधार्भातील एक पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे या पत्राद्वारे हा खटला इतरत्र चालवला तर खटल्यावर
परिणाम होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे सनातन संस्थेंच्या वतीने अनेक वेळा दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत आहे यामुळे हा खटला बाहेर चालवल्यास याचा गंभीर परिणाम खटल्यावर होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे त्याच बरोबर प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबाला हि धोका उद्भवू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे शिवाय या खटल्याच्या सुनावणी साठी अड्द्वोकेट जनरल यांची नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी केली आहे उच्च न्यायालयात १४ जानेवारीला होणार्या सुनावणीपूर्वी त्यांची नेमणूक करण्याची मागणी हि करण्यात आली आहे.समीर गायकवाड वर नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याची सुनावणी आता जिल्हा न्यायालयात वर्ग झाली असून त्याची पहिली सुनावणी १३ जानेवारीला होणार आहे त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
Leave a Reply