
कोल्हापूर : भीमा उद्योग समूह आणि क्रिएटिव्ह इव्हेंट्स आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन येत्या २३ ते २६ जानेवारी दरम्यान मेरी वेदर ग्राउंड येथे पार पडत आहे.नाविन्यपूर्ण उपक्रमासह दुष्काळ परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे यासाठी खास मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच जिह्यातील ३६ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या.त्या सर्व ग्रामपंचायतीनचा प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पोलीमर्स यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.पशुपक्षी खास दालनमध्ये संकरीत म्हैशी,कुक्कुटपालन,वैशिट्यपूर्ण चीनी कोंबड्या यांचा समावेश असणार आहे.डॉ.बावराकर प्रा.ली.चे सह प्रायोजकत्व,शासनाचा कृषी विभाग,एन.सी पीएच आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभले आहे.२०० हून अधिक महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स,दुपारी सर्वाना मोफत झुणका भाकरी देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील प्रायोगिक तत्वावर नवीन संशोधन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सत्कारही केला जाणार आहे.शेतकयांच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्या ,प्रश्न यांचे निर्सन व्हावे व नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा त्यांना लाभ मिळावा यासाठी या प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते.असेही खासदार महाडिक यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले,डॉ.धैर्यशील बावसकर, क्रिएटिव्ह इव्हेन्ट्सचे सुजित चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply