कोल्हापूर: हिंदुरक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. अशा या महाराणा प्रताप यांचा ‘बालभारती’च्या इयत्ता ७ वीच्या ‘इतिहास आणि नागरिकशास्त्र’ या पुस्तकात ‘एकेरी’ उल्लेख करण्यात आला होता. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात जो एकेरी उल्लेख करण्यात आला होता, त्यातून त्यांचा अवमानच झाला आहे. हिंदुस्थानातील राष्ट्रपुरुषांचा आदर हिंदुस्थानात नाही, तर काय परदेशात ठेवला जाणार आहे काय ? असा संतप्त प्रश्न करत राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सेक्युलरवाद्यांचा प्रभावामुळे हिंदु राजांचा उपमर्द आणि मोगलांचा उदोउदो चालू आहे. हे अक्षम्य आहे. हिंदु समाज हे कदापि सहन करणार नाही. राष्ट्रपुरुषांचा अवमान ही इतिहासाशी प्रतारणा आणि राष्ट्राशी द्रोह केल्यासारखेच आहे. त्यामुळे यापुढे अन्य कोणी असा हलगर्जीपणा करू नये, यासाठी महाराणा प्रताप यांचा चुकीचा उल्लेख करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन् पाठ्यपुस्तकात राष्ट्रपुरुषांविषयी चुकीचा उल्लेख केल्याप्रकरणी ‘बालभारती’ने हिंदु समाजाची जाहीर क्षमायाचना करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’मध्ये केली. २९ जुलै या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन झाल्यावर तहसीलदार शीतल मुळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. उदय भोसले, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, केर्ले येथील शिवसेनेचे श्री. रामभाऊ मेथे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, सौ. प्रीती पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Leave a Reply