
कोल्हापूर : गेली 6 वर्षे तपास करूनही दाभोलकर-पानसरे हत्येसंदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथके तपास करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा काहीही पुरावा मिळालेला नाही. पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड यांना 19 महिन्यांनी जामिनावर मुक्त करण्याची वेळ आली, तसेच तीन वर्षांनंतरही डॉ. तावडे यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी एकही पुरावा यंत्रणांकडे नाही. सतत बदलणारे आरोपी, मास्टरमाईंड आणि कथानके पाहता तपासाचा विचका झालेला आहे. त्यामुळेच दोन्ही खटले न्यायालयात चालवा, असे म्हणण्याचे नैतिक धैर्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे नाही. खटले चालवण्यापेक्षा त्यावर स्थगिती आणून वेळकाढूपणा करण्याचे तंत्र अंनिसने अवलंबले आहे. आता ‘20 ऑगस्ट’ जवळ येत असल्यामुळे नेहमीप्रमाणे ‘आम्ही म्हणू तेच खरे !’ आणि ‘आम्ही सांगू तेच गुन्हेगार !’ अशा अविवेकी वृत्तीतून सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर कारवाईची मागणी अंनिसने केली आहे. आतापर्यंत अंनिसचा यंत्रणांवर विश्वास नव्हता, आता न्यायालयावरही त्यांचा विश्वास राहिलेला नाही, असेच दिसते. खरे तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतिहास पहाता, त्यांचे कार्यकर्ते हे नक्षलवादी कारवायांत सहभागी असल्याच्या कारणावरून अटक झालेले आहेत, ‘एफसीआरए’ कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची ‘एफसीआरए’ मान्यता शासनाने रद्द केली, ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या संस्थां’च्या गृहमंत्रालयाच्या सूचीत अंनिसचे नाव होते, त्यामुळे अशा नक्षल समर्थक अंनिसवरच शासनाने कारवाई करायला हवी, अशी मागणी असणारे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, राजू यादव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, शहराध्यक्ष जयवंत निर्मळ, प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, हिंदु एकता आंदोलनाचे चंद्रकांत बराले, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, जंगम समाजाचे महालिंग जंगम, हिंदु जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे आणि शिवानंद स्वामी, सर्वश्री लालू चौगुले, महेश पवार उपस्थित होते.
Leave a Reply