News

दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी कमी पडणार नाही: पालकमंत्री सतेज पाटील

October 19, 2020 0

कोल्हापूर: प्रभाग क्रमांक ७१ येथील एकजुटी तरूण मंडळ, कपिल पार्क, तसच शिवराम पोवार नगर, काशीद कॉलनी, त्याचबरोबर कृपासिंधु नगरी आणि लक्ष्मी बळवंतनगर येथील अंतर्गत रस्ते तसंचं काही ठिकाणच्या ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील […]

News

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा: आम आदमीची मागणी

October 19, 2020 0

कोल्हापूर: राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती […]

News

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून महापौरांनी राबविला स्तुत्य उपक्रम

October 19, 2020 0

कोल्हापूर: महापौर सौ. निलोफर आश्कीन आजरेकर यांनी आपला वाढदिवस करोनाच्या पार्श्वभूमीवर “माझा प्रभाग माझे कुटुंब” यानुसार साजरा केला. यापूर्वी प्रभागातील नागरिकांना करोना पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाफेचे मशीन वाटप केले होते. सध्या करोनाचा प्रभाव असल्यामुळे व […]

News

अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर

October 19, 2020 0

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झाला आहे. विशेषतः मराठवाडा भागात या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे या नुकसानाकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत असताना, युवराज संभाजीराजे छत्रपती हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रत्यक्ष […]

News

वाचनकट्टातर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

October 19, 2020 0

कोल्हापूर:हल्लीच्या धावपळीच्या युगात वाचकांची संख्या वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. या दृष्टीनेच लेखकांनी वाचकांच्या बदलत्या आवडीनुरूप लेखन करावे जेणेकरून चांगल्या प्रकारचे लिखाण वाचकांसाठी उपलब्ध होईल,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. वाचनकट्टा प्रकाशनतर्फे आयोजित सिराज करीम शिकलगार लिखित ‘आई, ती आणि एकत्र कुटुंबपद्धती’,  प्रा. रेखा निर्मळे,चौगुले व प्रा. निगार मुजावर लिखित रिसर्च मेथडॉलॉजी आणि संजय दे. पाटील व युवराज स. कदम संपादित निबंध या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वाचनकट्टा प्रकाशन तर्फे आज देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिनानिमित्त या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाचनकट्टा संस्थापक युवराज कदम यांनी उपस्थितींना या सोहळ्याची व पुस्तकांची ओळख करून दिली.आई, ती आणि एकत्र कुटुंबपद्धती या पुस्तकात श्री. शिकलगार यांनी सामाजिक जडणघडणीचा आणि एकूणच बदलत्या कुंटुंबपध्दती तसेच संस्कृतीचा आढावा घेतला आहे. निबंध या पुस्तकात कोरोना कालखंडात वाचनकट्टा तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी निबंधांचे संपादन करण्यात आले आहे. तर रिसर्च मेथडॉलॉजी या पुस्तकात सेट व नेट परिक्षांबद्दलचे अद्यवत ज्ञान व प्रश्न यांचा समावेश आहे. यावेळी युवराज स. कदम, उपप्राचार्य प्रा. टी. के. सरगर, एस. डी. पाटील, डॉ. सचिन चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, रियाज मुजावर, वसंत चौगुले, ऋतिक  पाटील, सचिन लोंढे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

News

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार: पालकमंत्री सतेज पाटील

October 18, 2020 0

कोल्हापूर: अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी […]

News

श्री देवी अंबाबाईची महाविष्णू स्वरूपात पूजा

October 18, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री देवी अंबाबाईची परशरांना महाविष्णू स्वरूपात पूजा बांधण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी जन्मा घोर तप […]

News

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

October 18, 2020 0

सेनापती कापशी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले.कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते […]

News

हस्तकला विभागीय कार्यालयास जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत : जिल्हाधिकारी दौलत देसाई

October 18, 2020 0

कोल्हापूर: हस्तकला विभागीय कार्यालयास हवी ती मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल, असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले.येथील उद्योग भवन येथे हस्तकला विभागाच्या कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पूर्वी […]

News

जलयुक्त शिवारमध्ये दहा हजार कोटींचा गैरव्यवहार: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

October 16, 2020 0

कोल्हापूर:भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत सरकारच्या दहा हजार कोटी निधीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट निरीक्षण कॅगच्या  अहवालात नोंदविले आहे. या अभियानामुळे गावागावातील पाण्याची पातळी तर वाढलीच नाही. परंतु, भ्रष्टाचार मात्र जोरात झाला आहे,  असा आरोप […]

1 151 152 153 154 155 200
error: Content is protected !!