कोल्हापूर:सध्याच्या परिस्थितीमध्ये औषध निर्माणक्षेत्रामध्ये व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी त्याचबरोबर रोजगारनिर्मितीसाठी एम.एस्सी.मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमअत्यंत उपयुक्त आहे. यात जागतिक करिअरच्या संधी आहेत,असे प्रतिपादन युनेस्को बायोएथिक्सचे प्रमुख तथा जर्मनी येथील होश्युलहॅनोव्हर युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस अँड आर्टस्प्रा.डॉ.गेरहार्ड फोर्टवेगेल यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री अधिविभागात एम.एस्सी.- मेडीकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. फोर्टवेंगेल बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी हॅनोव्हर विद्यापीठाचे डॉ.ज्ञानेश लिमये, पुण्याच्या ‘सीडीजीएमआय’चे संचालक प्रा.डॉ.अतुल कापडी, कोल्हापूरच्या मनोरमा इन्फो-सोल्युशनच्या कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी दाणीगोंड यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.गेरहार्ड फोर्टवेंगेल म्हणाले, मेडीकल इन्फॉर्मेशन […]