कोल्हापूर : राज्यातील पाण्याच्या निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी गावागावातील तलावातील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्यावी असे आवाहन आवाहन सहकार व पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र – जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळंबा तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा सयंत्रांचे पूजन करुन शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर सौ. अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मि. स. जिवने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराव मास्तोळी, आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply