कोल्हापूर:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतराळवीर होण्याची क्षमता असते.पण ग्रामीण भागात अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या संधी आणि सोयी उपलब्ध नसतात.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी या क्षेत्रात मागे पडतात.यामुळेच डॉ.डी.वाय.पाटील साळोखे नगर इंजिनीअरिंग कॉलेजच्यावतीने कोल्हापुरात अंतराळविज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगबरोबरच अंतराळ विज्ञानाचा अभ्यास करता येईल.आणि भविष्यात विविध संशोधनामध्ये त्यांना याचा उपयोग होईल.याकरिता आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत इस्त्रोचे माजी डायरेक्टर पद्मश्री प्रमोद काळे,डॉ.अरविंद भोसले,बी.एच.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.इस्त्रोची कामगिरी गेल्या काही वर्षात चागली असून या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत.यासाठी कोल्हापूर आणि ग्रामीण भागातील मुलामुलींना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.असे उद्गार बी.एच.पाटील यांनी काढले.यावेळी इस्त्रोमधील त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले.या प्रशिक्षण केंद्राचा उपयोग विद्यार्थ्याना व्हावा यासाठी कॉलेज नेहमीच प्रयत्न करणार आहे असे संस्थेचे संचालक डॉ.व्ही.पी.गोसावी यांनी सांगितले.तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने,उपयुक्त अभ्यासक्रम यामुळे इंजिनिअरिंगबरोबरच या क्षेत्रात योग्य पद्धतीने प्रवेश मिळविण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र कोल्हापुरात होणे गरजेचे होते.डी.वाय.पाटील कॉलेजच्या सहकार्याने अंतराळात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे असे प्राचार्य डॉ.टी.बी.मोहिते-पाटील यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी धैर्यशील पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply