
कोल्हापूर :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत दादासाहेब फाळके पनेल असून पनेलचे कोल्हापूर ऑफिसचे उद्घाटन मा. श्री पंडित बोंद्रे, इंद्रजीत बोंद्रे (मा. नगरसेवक) रामभाऊ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंडित बोंद्रे यांनी निवडणुकीत दादासाहेब फाळके पनेल हेच योग्य असल्याची ग्वाही दिली. तर रामभाऊ चव्हाण यांनी दादासाहेब फाळके पनेल मधील सर्व उमेदवार निस्वार्थीपणे व प्रामाणिकपणे काम करणारे उमेदवार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांनी दादासाहेब फाळके पनेलला मते देवून विजयी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इंद्रजीत बोंद्रे यांनी दादासाहेब पनेलकरिता शुभेच्या दिल्या असून महामंडळाचा कारभार उत्कृष्टपणे करणारे सर्व कला कर्मी एकत्र आल्याचे समाधान व्यक्त करून सभासदांनी सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन केले.
या प्रसंगी दादासाहेब फाळके पनेलचे निर्माता विजय शिंदे, मोहनराव पिंगळे, बाळासाहेब गोरे, दिपाली सय्यद, कोमल देसाई, दत्ता लोंढे, गणेश पवार, आदिलशहा मुल्ला या उमेदवारांच्यासह रंकाळावेश तालीम मंडळाचे कार्यकर्ते, नगरसेवक शेखर कुसाळे, अध्यक्ष कोशोर कालेकर, देवेद्र चौगुले, दिलीप माने, दिग्दर्शक किसन बोंगाळे, निर्माता राजू मास्तर व इतर अनेक सभासद उपस्थित होते.चित्रपट महामंडळ च्या माध्यमातून कलाकार आणि चित्र नागरी च्या समस्या सोडवून पुन्हा कोल्हापुरची ओळख कलापुर करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Leave a Reply