
कोल्हापूर : धन्वंतरी माइंड केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बाल मानस शास्रावरील विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ.देवव्रत हर्षे आणि डॉ.स्नेहा हर्षे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिसंवादात मुलांच्या वर्तणुकीतील समस्या आणि पालकत्व या विषयावर मानसोपचार तज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.किशोर गुजर मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई चे मानसोपचार तज्ञ डॉ.ओंकार माटे अध्ययन अक्षमता एक नवे आव्हान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवाद येत्या शनिवारी 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 ते 8 या वेळेत शाहु स्मारक भवन येथे होणार आहे.प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
मुलांमधे आढळून येणारी अतीचंचलता, हट्टीपणा,चिडचिडेपणा यासारख्या समस्या तसेच मोबाईल इंटरनेट आणि टीवी च्या आहारी गेलेल्या मुलांच्या समस्या यावर उपाय तसेच पालकांची भूमिका यावर मुक्त चर्चा होणार आहे. मान्यवर वक्ते उपस्थितांशी संवाद साधून शंकांचे निरसन करणार आहेत तरी याचा लाभ पाल्य,पालक शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन धन्वतंरी बाल मनोविकास केंद्र यांच्या वतीने करन्यात आले आहे.
Leave a Reply