
कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन महिन्यापुर्वी नाम.चंद्र्कांतदादा पाटील यांच्या संक्ल्पनेतून जेष्ठ नागरीकांसाठी “नटसम्राट” या चित्रपटाचे आयोजन केले होते. या चित्रपटास मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता यावेळी कोल्हापूरच्या नाट्य रसिकांसाठी भाजपा वर्धापन दिना निमीत्य “वाहतो ही दुर्वांची जुडी” या अतिशय गाजलेल्या नाट्यप्रयोगच्या दोन प्रयोगांचे आयोजन दि. १७ एप्रिल २०१६ रोजी केशवराव भॊसले नाट्यगॄह येथे केले आहे. सदर नाटक विजय गॊखले दिग्दर्शित बाळ कोल्हटकर यांची नाट्यकॄती आहे. यामध्ये नेपथ्य : प्रसाद वालावलकर, व्यवस्थापक : प्रवीण दळवी, कलाकार : “ताई” च्या भूमिकेत शलाका पवार, जान्हवी पणशीकर, नरेश बिडकर, विलास गुर्जर, प्रांजल दामले, अमोल कुलकर्णी, विलास म्हामण्कर व किशोर सावंत आणी “भाऊ” च्या भूमिकेत अंशुमन विचारे इ. नामवंत कलाकार नाटक सादर करणार आहेत.
ज्यांना या नाटकाची मोफ़त प्रवेशिका घ्यायची असतील त्यांनी भाजपा जिल्हा कार्यालय बिंदू चौक येथे दि.१४, १५, १६ एप्रिल २०१६ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. प्रथम येणा-यास प्राधान्य दिले जाईल.
नाट्यप्रयोग दिनांक रविवार दि.१७ रोजीपहिला प्रयोग दुपारी १२:३० वा आणि दुसरा प्रयोग सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे.
Leave a Reply