
कोल्हापूर :कोल्हापुरात विजयी रली काढण्याचा प्रयत्नात असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी जमावबंदी आदेशानुसार कारवाई करून ताब्यात घेतले आहे यावेळी भूमाता ब्रिगेड यांनी पोलिसमध्ये धक्काबुक्की झाली तर गाभार्यात प्रवेश करतानाही प्रचंड रोषाचा सामना करत तृप्ती देसाई यांनी महालक्ष्मी मंदिरात गाभार्यात जाऊन दर्शन घेतले यावेळी मंदिरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
करवीर निवासिनी श्री अंबाबाई च्या गाभार्यात महिलांना दर्शन मिळावे यासाठी कोल्हपुरातल्या विविध पक्षांनी आंदोलन सुरु केले होते यायचं एक भाग म्हणून बुमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापुरात येऊन विजयी रली काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता तर दुसरीकडे तृप्ती देसाई यांना विरोध करण्यसाठी कोल्हापुरातील सर्व हिंदुत्वादी संघटनानी एकत्र येऊन तृप्ती देसाई यांच्या विरोधात प्रती रली काढण्यचे नियोजन केले होते तसेच देसाई यांना मंदिर परिसरात फिरकू न देण्यसाठी भाविकांनी आणि हिंदुत्वादी संघटनानी या परिसरातील दुकाने बंद करून त्यान विरोध करण्यासाठी गर्दी केली होती तृप्ती देसाई आज साडेचार वाजता आपल्या पन्नास हून अधिक कार्यकर्त्यांना घेऊन शिरोली मार्गे कोल्हापुरात दाखल झाल्या त्या ताराराणी चौकात येणार हे गृहीत धरून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तृप्ती देसाई या एका खाजगी बस मधून रुईकर कॉलनी परिसरात येताच त्यांना पोलिसांनी घेराव घालून जमावबंदी अदेसाची नोटीस बजावली यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसासमोर जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी तृप्ती देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले या सर्व कार्यकर्त्याना पोलिसांनी अलंकार हॉल परिसरात आणून त्यांची चौकशी सुरु केली
त्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली यावेळी श्रीपुजक आणि हिंदुत्वादी संघटनानी मंदिराच्या गाभार्यात जाऊ नका असे तृप्ती देसाई यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला न जुमानता त्यांनी गाभार्यात प्रवेश करण्यचा निर्णय घेतला त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना महालक्ष्मी मंदिरात आणण्यात आले महिला पोलिसांनी कडे करून त्यांना गाभार्यात नेले मात्र यावेळी तृप्ती देसाई यांना प्रचंड धक्काबुक्की करण्यात आली शिवाय त्यांच्यावर शाईफेक करण्यचा प्रयत्न झाला तर प्रचंड घोषणाबाजी आणि कुंकू फेकून त्यांना जोरदार विरोध करण्यात आला मात्र यातूनही त्यांना पोलिस गाभार्यापर्यंत घेऊन गेले या दरम्यान पुजार्यांना हि गाभार्यात चुडीदार असल्याने त्यांना रोखण्यात आले त्यामुळे प्रांत अधिकारी प्रशांत पाटील अप्पर पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी बळाचा वापर करत पुजार्यांना बाहेर काढले आणि दर्शनाचा मार्ग मोकळा केला त्यामुळे चिडलेल्या स्थानिक भाविक आणि हिंदुत्वादी संघटनांनी प्रश्सनाच्या विरोधात घोशांबाजी करत नाराजी व्यक्त केली
मंदिरात पोलिसांनी कडे करून तृप्ती देसाई यांना गाभार्यात नेल्यानंतर या ठिकाणी श्री पुज्कानी त्यांनी तीव्र विरोध केला यावेळी एका पुजार्याने तृप्ती देसाई यांना मारहाण करण्याचा प्रकार हि घडला वृद्ध असलेल्या या पुजार्याने तृप्ती देसाई यांच्या डोक्याला चापट मारली मात्र यामुळे खचून न जाता तृप्ती देसाई यांनी गाभार्यात जाऊन दर्शन घेतले
तृप्ती देसाई यांना गाभार्यात येण्यासाठी हिंदुत्वादी संघटनानी तीव्र विरोध दर्शवला होता न्यायालयात याचिका दाखल असल्याचे कारण देत जिल्हाधीकार्यापार्यंत जाऊन हा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न झाला तर मंदिरात ५०० हून अधिक जमावाने त्यांना तीव्र विरोध केला मात्र यातूनही गाभार्यात जाऊन दर्शन घेतेलेल्या तृप्ती देसाई यांनी बोटाने व्हिक्टरी ची खून करून आपले ध्येय साध्य झाल्याचे स्पष्ट केले
विरोध करणाऱ्या एका महिला भाविकाला चक्कर आली त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले तर गाभार्यात जायला विरोध करणाऱ्या महिलांना तृप्ती देसाई गाभार्यात गेल्याचे पाहून अश्रू रोखता आले नाहीत.
Leave a Reply