
कोल्हापूर : गुरुवार दि. 15 सप्टेंबर 2016 रोजी गणेशोत्सव मंडळाचे व घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 पंचगंगा नदीवरील जुना व नवीन पूलावरुन गणपती विसर्जन केल्यास वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रेनद्वारे/जेसीबीद्वारे अथवा अन्य मार्गाने जुन्या व नवीन पुलावरुन विसर्जन करणे धोक्याचे आहे. त्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वरील पंचगंगा नदीवरील जुना व नवीन पूलावरुन गणपती विसर्जन करु नये याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग,कोल्हापूर यांनी प्रशासनाला प्रस्तावित केले असून त्यानुसार उचित कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पोलीस विभागाला दिले आहे.
Leave a Reply