स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून तीन नविन मालिका सुरू

 

कोल्हापुर: स्टार प्रवाह’वर १० ऑक्टोबरपासून तीन नविन मालिका सुरू 20161012_165247होतआहेत .या मालिकांचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले असून आज या तिन्ही मालिकातील कालकारानी पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारल्या.यातील 7 वाजता सुरु असलेल्या’नकुशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. या मालिकेद्वारे महेशचा संगीतकार म्हणून ‘स्टार प्रवाह’बरोबर नवा प्रवास सुरू होत असून, या मालिकेच्या टायटल साँगसहित टीजरला सोशल मीडियात भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
आजपर्यंत टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी’ या मालिकेतून भरून निघणार आहे. ही अतिशय वेगळ्या विषयावरची मालिका असून ती नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे.
गीतकार गाणं समीर सामंतनं नकुशीचं टायटल साँग लिहिलं आहे. तर, बेला शेंडेनं गाणं गायलं आहे. महेशनं संगीतबद्ध केलेलं टायटल साँग’नकुशी’चं वैशिष्ट्य ठरणार आहे. वास्तवाचं नेमकं चित्रण हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट  मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.असे चिंचाळकर म्हणाले.यात आदिती देशपांडे,नकुशी म्हणजेच आभा बोडस, विद्याधर जोशी,स्वाती चिटणीस अशी स्टारकास्ट आहे.
मराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना ‘स्टार प्रवाह’नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार ते  गुरुवार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होत असलेल्या ‘गोठ’ या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे. मराठी टीव्ही मालिकांमध्ये अंडरवॉटर चित्रीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.अशक्य गोष्ट शक्य केल्याचे चिंचाळकर म्हणाले.
‘गोठ’ या मालिकेचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.’आता थांबायचं नाय’ म्हणत नायिकेनं पुरुषसत्ताक पद्धतीला थेट आव्हान दिल आहे. त्यामुळे मालिका नक्कीच वेगळ्या आशयविषयावर भाष्य करणार असल्याचे प्रमुख भूमिकेतील डॉ. रूपल नंद हीने सांगितले.हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये मोठं नाव असलेल्या  छायालेखक अभिषेक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आलं आहे. अभिषेक हा बर्फीसारखे उत्तम चित्रपट केलेल्या प्रख्यात दिग्दर्शक अनुराग बासूचा भाऊ आहे. ‘गोठ’ ही अभिषेकची पहिलीच मराठी मालिका आहे. फिल्मसिटीतील लेकमध्ये आणि एका स्विमिंग पूलमध्ये खास व्यवस्था करून हे चित्रीकरण झालं. अंडरवॉटर चित्रीकरण फार खर्चिक असतं. त्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. मात्र, अभिषेकनं मांडलेली अंडरवॉटर चित्रीकरणाची कल्पना मालिकेची निर्मिती संस्था फिल्म फार्म आणि स्टार प्रवाह यांनीही ‘आता थांबायचं नाही’ या विचारानं उचलून धरली.  आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, अंडरवॉटर चित्रीकरणातील तज्ज्ञ छायालेखकांनी काम केलं. भव्यता आणि उत्तम वातावरण निर्मिती करणारं छायांकन हे या मालिकेचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.त्याचबरोबर रात्री 8 वाजता हास्य कल्लोळ असणारी ग सहाजणी ही विनोदी मालिका प्रेक्षकांना टेंशन फ्री करेल असे विनोदवीर दिगंबर नाईक यांनी सांगितले.
मराठी चित्रपटाप्रमाणे टीवी मालिका देखील कात टाकत आहेत.दर्जा, विषय आणि उत्कृष्ट मांडणी यामुळे एकूणच या तिन्ही मालिका प्रेक्षकांचे संपूर्ण मनोरंजन तर करेलच आणि सामाजिक जाणीव देखील निर्माण करेल असा विश्वास दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि सर्व कलाकार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!