
कोल्हापूर: राज्य शासनाचे सन १९९४ पासून २००४ पर्यंत वेळोवेळी जरी केलेल्या निर्णयानुसार(जीआर) विशेष मागास प्रवर्गाची आरक्षण अंमलबजावणी व्हावी,यंत्रमाग महामंडळ,वस्त्रोद्योग महामंडळ,कारखानदारी प्रतिनिधित्व,मिळावे,उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी एस.बी.सी.विशेष सवलत असावी,यासह एकूण सोळा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत आज विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारीप्रतिनिधी ज्ञानेश्वर शेडकंडे यांना निवेदन देण्यात आले.यात समन्वयक रमेश तांबे,धोंडीराम पागडे,राजेंद्र मकोटे,रमेश दिवटे,सुरेश काजवे,महेश देव,दिलीप घतटे,सुभाष मुरगज,राजू काटे,आदींचा समावेश होता.राज्य संस्थापक शशिकांत आमणे यांच्यासह पंढरीनाथ ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यातील इचलकरंजी,पेठ वडगाव येथून दीडशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.रली,मोर्चा,शिष्टमंडळ यामाध्यमातून विविध आंदोलनाद्वारे आज निवेदन देण्यात आले.भविष्यात आंदोलन व्यापक करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
Leave a Reply