
कोल्हापूर : ठाण्याजवळ दिवा येथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अवैध इमारतींवर कारवाई केली जात असताना वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी स्वाती नाईक व कॅमेरामन संदीप भारती यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
पत्रकारांवर हल्ले करण्यात झालेल्या गावगुंडाना त्वरीत अटक करण्याची मागणी करीत अशा प्रवृत्तीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, सरकार कोणाचेही असो हितसंबंध दुखावले गेले की पत्रकारांवर हल्ले केले जातात. अलिकडे त्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे. गेली अनेक वर्षे पत्रकार संरक्षण कृती समितीतर्फे कडक कायद्याची मागणी केली जात आहे. सरकारने पत्रकारांवर होणाºया हल्याची गंभीरपणे दखल घेऊन येत्या अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायद्याला मंजुरी द्यावी.
यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष गुरुबाळ माळी, कार्याध्यक्ष प्रताप नाईक, समीर मुजावर, राहूल खाडे, डी. बी. चव्हाण, विकास कांबळे, सुनील पाटील, युवराज पाटील, दिलीप भिसे, , संभाजी गंडमाळे, सतीश घाटगे, संजय देसाई, प्रदीप शिंदे, सचिन ठिपकुर्ले, सतेज औंधकर, बाळासाहेब पाटोळे, विनोद सावंत, पांडूरंग दळवी, अप्पासाहेब माळी, इंदूमती गणेश, शुभांगी तावरे, संघमित्रा चौगले, श्रद्धा जोगळेकर, सुमय्या वाळवेकर,अश्विनी टेंबे,अहिल्या परकाळे, पांडूरंग पाटील, अर्जून टाकळकर, अमीत गद्रे, राहूल जगताप, अक्षय थोरवत, मिथून राजाध्यक्ष, पप्पु अत्तार, संतोष तोडकर, प्रमोद व्हनगुत्ते, अमर पाटील, नाज ट्रेनर, भूषण पाटील, नसीर अत्तार, शशिकांत मोरे, सचिन सावंत, सुनील काटकर, संदीप पाटील, अमृत मंडलिक, विजय केसरकर, प्रकाश आयरेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply