
पंचशील हॉटेल येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हॉटेलच्या बंद खोलीत स्थानिक आमदार व जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत ठाकरे यांनी प्रथम जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालाचा आढावा घेतला. किती जागेवर आपले उमेदवार उभे होते. अन्य राजकीय पक्षांची स्थिती काय होती, याची माहिती घेतली. जिल्ह्यात शहर वगळता शिवसेनेचे पाच आमदार आहेत. कोणत्या मतदार संघात किती उमेदवार होते, याची माहिती घेतली. निवडणूक निकालानंतर तीनही जिल्हाप्रमुखांनी सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे अहवाल सादर केला होता. मंडलिक यांनी हा अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. यावर आपण 9 मार्चनंतर निर्णय देऊ, असे सांगितले. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, मंत्री विजय शिवतारे, आ. चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, भूषण पाटील, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply