
कोल्हापूर – शुक्रवार, ३ मार्च २०१७ या दिवशी पुरोगामी विचारसरणीचे नेते डॉ. कृष्णात किरवले यांची हत्या झाली. त्यांचे शेजारी प्रीतम गणपत पाटील यांनी डॉ. किरवले यांची हत्या केल्याचे, तसेच प्रीतम पाटील यांनी पोलीस तपासात स्वत: खून केल्याची स्वीकृती दिल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. किरवले यांची हत्या आर्थिक कारणातून झाल्याचे स्पष्ट होत असतांना जाणीवपूर्वक हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करणे हा व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचे सूचित होते. त्यामुळे डॉ. किरवले यांचा खून अर्थिक बाबीतून झाला त्याप्रमाणे कॉ. पानसरे यांचा खून आर्थिक माध्यमातून झाला का याचा तपास करावा, अशा मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना करवीरतालुकाप्रमुख. राजू यादव, बजरंग दलशहरप्रमुख महेश उरसाल, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, अजिंक्य पाटील, श्रीशिवप्रतिष्ठानचे शहरप्रमुख शरद माळी, पतीत पावन संघटना जिल्हाध्यक्ष
सुनील पाटील, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री गोविंदराव देशपांडे, देवराज सहानी, संजय पौंडकर यांसह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply