
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आज शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी युवकांना प्रेरित करण्यासाठी शहीद दिन पाळला जातो. शिवाजी विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विशेष कार्य अधिकारी डॉ. डी.टी. शिर्के, परीक्षा संचालक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे, डॉ. भारती पाटील, डॉ. भगवान माने, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply