
कोल्हापूर – जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महानगरपालिकेच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्यावतीने आज सकाळी 9.00 वा. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा सहभाग असलेल्या क्षयरोग जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रारंभी प्रमुख पाहुणे स्थायी समिती सभापती डॉ. संदिप नेजदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते दिपप्रज्चलन करण्यात आले तसेच 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या मायक्रोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जंतुचा शोध लावणारे डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. यानंतर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.उदयकुमार भट यांनी उपस्थितांना आजच्या दिवसाचे महत्व, दैनंदिन डॉट्स उपचार पध्दतीबाबत थोडक्यात माहिती सांगून क्षयरोग प्रतिबंधाबाबतची शपथ देवविली.
स्थायी समिती सभापती डॉ संदिप नेजदार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात झाली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर, महाराष्ट्र हायस्कुल, स.मो.लोहिया हायस्कुल, कोल्हापूर हायस्कुल या शाळेमधील विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी, शिक्षक, डि.के. शिंदे समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस.एस. आपटे, प्राध्यापक, विद्यार्थी, शहर क्षयरोग नियंत्रण सोसायाटीकडील सर्व स्टाफ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply