
कोल्हापूर– कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळनेे दिलबहार तालीम (ब) चा 2 विरुध्द 1 गोलने पराभव करुन तृतीय क्रमांक पटकाविला.
पुर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या आकाश भोसलेे याने 30 व्या मिनिटास पहिला गोल नोंदवून संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या कपिल साठे याने 52 व्या मिमिनटास गोल करुन संघास 2 विरुध्द 0 अशी आघाडी मिळवून दिली. दिलबहार तालीमकडून 60 व्या मिनिटास विक्रांत पठाण याने मैदानी गोल करुन सामना 2-1 असा आणला. सामना संपेपर्यंत हिच आघाडी कायम राहिल्याने शिवाजी तरुण मंडळाने सदरचा सामना 2 विरुध्द 1 गोलने जिंकून तृतीय क्रमांक पटकाविला.
यानंतर नगरसेवक, अधिकारी यांचा प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडी विरुध्द भाजपा, ताराराणी आघाडी यांच्यात खेळविण्यात आला. सदर सामन्याचे उदघाटन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व महापौर सौ. हसिना फरास यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना संघाकडून उप-महापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, परिवहन समिती सभापती नियाज खान, प्राथमिक शिक्षण समिती सभापती राहूल चव्हाण, संजय मोहिते, मुरलीधर जाधव, पक्षप्रतोद प्रविण केसरकर, नगरसेवक सचिन पाटील, राहूल माने, लाला भोसले, प्रतासिंह जाधव, तौफिक मुल्लानी, राहूल चव्हाण, माजी नगरसेवक आदील फरास, विनायक फाळके, राजेश लाटकर हे खेळले.
Leave a Reply