कोल्हापुरातील पत्रकारांना विमा संरक्षण लागू करण्यासाठी प्रयत्नशील: पालकमंत्री कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयाचे शानदार उदघाट्न

 
कोल्हापूर : पत्रकारांचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे पत्रकारांना विमा संरक्षण लागू करण्यासाठी प्रत्येकाच्या नावे 4 हजार 500 रुपयांचे एकरक्कमी ठेव ठेवून त्यातून येणाऱ्या व्याजातून विम्याचे हप्ते भरण्यात येतील, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्ती यांनी पुढे येवून सक्रिय योगदान द्यावे असे अवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज हे होते. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. या समारंभास महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदिप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, उपमहापौर अर्जून माने अदि मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरातील पत्रकारांचे जीवन सुखी आणि सुरक्षीत व्हावे यासाठी दरवर्षी 330 रुपये प्रिमियम असलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा एकरक्कमी प्रिमिअम भरुन त्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, याबरोबरच दरमहा 210 प्रिमियम असलेली अटल पेन्शन योजनेचा 1 लाख 5 हजाराचा प्रिमियम एक रक्कमी भरल्यास त्यांना 60 वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला व त्यानंतर मुलांना आर्थिक लाभ मिळेल. मात्र आशा या क्रांतिकारक योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि दानशुरांनी पुढे येण्याची गजर असल्याचेही ते म्हणाले.
कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने पत्रकारांची आणि पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिंधी सोय झाली आहे. ही जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापालिकेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्यन्यवाद दिले. ते म्हणाले पत्रकारांसाठी हौसिंग सोसायटी तसेच शासनाची पेन्शन योजना राबविण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी बोलताना श्रीमंत शाहु छत्रपती महाराज म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजविकासात आणि लोकशिक्षणात पत्रिकारितेचे महत्वपुर्ण योगदान आहे. कोल्हापुरातील जयंती नाल्यासह अन्य नाल्यांच्या शुध्दीकरणाची विशेष मोहिम शासन आणि महापालिकेने हाती घेऊन पंचगंगा प्रदूषण रोखून कोल्हापूरवासीना स्वच्छ पाणी देण्यबाबत आवश्यक उपाययोजना करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
याप्रसंगी महपौर हसीना फरास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि कोल्हापूर प्रेस क्लबला शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले 23 वर्षाची परंपरा असलेल्या प्रेस क्लबला आज स्वत:च कार्यालय उपलब्ध झाले आहे. यामुळे कोल्हापुरातील पत्रकारांची तर सोय होईलच याबरोबरच पत्रकार परिषदा घेणाऱ्या सर्वांना एकाछताखाली पत्रकार परिषदा घेता येतील, ही खऱ्या अर्थाने सोय झाली आहे. कोल्हापुरातील पत्रकारांनी आज पर्यंत जागल्याची भूमिका सक्षमपणे पार पाडली असून यापुढेही सामाजिक बांधिकीच्या जाणीवेतून गरजवंत संस्था, समाजातील उपेक्षित घटक, आणि समाजिक प्रश्नांना न्याय यासाठी खंबीर भूमिका घेतील आहे. असे सांगून त्यांनी प्रेस क्लबच्या भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर देशपांडे यांनी केले तर कोल्हापूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले.
या समारंभास मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका,अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे सन्मानिय संपादक, कार्यकारी संपादक, निवासी संपादक, प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी कॅमेरामन, छायाचित्रकार यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व कार्यकारिणी सदस्य, जेष्ठ पत्रकार नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!