
मुंबई:मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजेझी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवलेतर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळविला. यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार‘कोडमंत्र’ नाटकाने मिळवला. प्रायोगिक नाटकांमध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकासहित आठ पुरस्कार मिळवित ‘हे राम’ या नाटकाने बाजी मारली. या सोहळ्याचा परमोच्च क्षण ठरला तो जीवन गौरव पुरस्कार प्रदानाचा. आपल्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिनयाने मराठी रंगभूमीला एकाहून एक सरस नाट्यकृती देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ‘झी नाट्य जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. विख्यात नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाट्यगौरव सोहळा येत्या ९ एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.
Leave a Reply