
कोल्हापूर: महाराष्ट्रातील सर्वात ऊंच 303 फुट तिरंगा कोल्हापुरातील पोलिस उद्यान मधे 1 मे रोजी सर्वांसाठी बघण्यासाठी खुला झाला. केएसबीपी या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने हे उद्यान आणि तिरंगा कोल्हापुरातील पर्यटनाचे आकर्षण बनले.पण 2 मे रोजी झालेल्या वादळी पावसाने झेंडा ख़राब होउ लागल्याने उतरविण्यात आला. वेध शाळेच्या अंदाजानुसार मे, जून, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यात वाऱ्याचा वेग प्रचंड असतो.त्यामुळे झेंडा फाटू शकतो.आलेखानुसर वाऱ्याचा वेग 5.5 प्रति सेकंड म्हणजेच ताशी 20 किमी किंवा जास्त असेल तर झेंडा फाटू शकतो म्हणून तिरंगा खाली उतरविला असे केएसबीपी चे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी सांगितले.
कोल्हापुरातील झेंडा भारतातील 2 ऱ्या क्रमांकाचा आहे.वाघा बॉर्डर येथील प्रथम क्रमांकाचा तिरंगा याच कारणासाठी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वर चढवितात.मुंबई तील द फ्लैग या कंपनिकडून 70 हजार रुला एक याप्रमाणे 5 झेंडे घेतले आहेत असेही सुजय पित्रे यांनी सांगितले.
Leave a Reply