
कोल्हापूर:सिद्धगिरी मठ(हॉस्पिटल) आणि पूजा ग्रुपच्यावतीने येत्या १३ मे ते १५ मे दरम्यान स्वास्थ्य मंत्रा प्रदर्शनाचे आयोजन हॉटेल पॅव्हेलीन येथील हॉल येथे सकाळी १० ते ८ या वेळेत करण्यात आले आहे.हे संपूर्ण प्रदर्शन आरोग्यविषयक असून यामध्ये संपूर्ण शरीर तपासणी,नाडी परीक्षण,आयुर्वेदिक उपचार, तज्ञ लोकांचे मार्गदर्शन,स्वास्थ्यासाठी सल्ले,व्याधी चिकित्सा,आयुर्वेदिक तसेच सेंद्रिय उत्पादने यांची माहिती आणि विक्री यासाठी स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत.
रोग म्हणजे स्वास्थ्याचा अभाव.रोगाचे मूळ नष्ट करून तो परत न उद्भवू देणे हाच निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा मुख्य उद्देश आहे.आजच्या बदलत्या जीवनशैलीत याची माणसाला गरज आहे.आयुर्वेदाने आपल्याला भरभरून दिले आहे.पण यातील कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नसतात.कोणतेही साईड इफेक्ट न होता आपले आजार बरे होण्यासाठी आयुर्वेदाची साथ धरणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे.यासाठीच हे प्रदर्शन भरविले आहे अशी माहिती सिद्धगिरी मठाचे स्वामी श्री अदृश्य काढसिद्धेश्वर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रदर्शनास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन पूजा ग्रुपचे पारस ओसवाल यांनी केले.पत्रकार परिषदेला हर्ष प्रोडक्टसचे प्रदीप भिडे,संजीव झुरळे,गिरीश आयरेकर,अतुल भंडारी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply