
कोल्हापूर :- सिद्धगिरी मठ आणि पूजा ग्रुप आयोजित स्वाथ्य मंत्रा या प्रदर्शनास पंचक्रोशीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला.निसर्गोपचार संदर्भातील तसेच नाडी आणि आहार तज्ञ यांची व्याख्याने आणि पारंपारिक आयुर्वेदिक वनौषधी,नाडी परीक्षण यास उदंड प्रतिसाद मिळाला.आज प्रदर्शनास आमदार अमल महाडिक,डॉ.सचिन पाटील,जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे,यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
आज आहारविषयक नियोजन या संदर्भात पुण्याच्या मंजिरी चुनेकर,नाडी तज्ञ डॉ.सुनील पाटील,डॉ.सचिन पाटील यांची माहितीपर व्याख्याने आणि लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी थेट संवाद साधला.आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.यात शेती संदर्भात शरद टोपकर,पूरक आहार या विषयी बोलण्यासाठी अश्विनी माळकर,आयुर्वेदाविषयी प्रदीप भिडे मार्गदर्शन करणार आहेत.प्रसारमाध्यमातील पत्रकारांनी ही याचा लाभ घेतला.आज शेवटचा दिवस असल्याने आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्र आणि आहार आणि आरोग्यदायी जीवन पद्धती जगण्यासाठी व याची माहिती घेण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ जरूर घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Leave a Reply