कोल्हापूर :२०१५ साली श्री अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाची सर्व प्रक्रिया पार पडली. याबाबत गेल्या २ वर्षात पुन्हा शंका उपस्थित करण्यात आल्या. दिवाणी न्यायालयाच्या अदेशा नुसार पुरातत्त्व खात्याने या सर्व वादाच्या मुद्यांचे निरसन केल्याने आता यावर पडदा पडला आहे.क तरीही देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांनी २०१६ साली पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया श्रीपूजकांनी नियम धाब्यावर ठेवून केली होती, असा आरोप केला होता. या आरोपाचे श्रीपूजकांनी आज पत्रकार परिषदेत खंडन केले. तसेच खोटा आरोप करणाऱ्या खाडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिली.
रासायनिक प्रक्रियेनंतर मूर्ती सुस्थितीत ठेवण्यासाठी ४२ घटकांपैकी ४ घटकांची जबाबदारी श्री पूजकांवर होती.ती आम्ही व्यवस्थित पार पाडत आहोत असेही केदार मुनिश्वर यांनी सांगितले. काही दिवसांपासून देवीच्या रासायनिक संवर्धनाच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी औरंगाबाद येथील पुरातत्त्व खात्याचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांना पाचारण केले होते. मिश्रा यांनी काल देवीच्या मूर्तीची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये मूर्तीवर पांढरे डाग दिसत असले, तरी त्यामुळे मूर्तीची कसलीही हानी झालेली नाही. हे डाग साफ करुन त्या मूर्तीचे पुन्हा रासायनिक संवर्धन करून, त्यानंतर मूर्तीवर प्रोटेक्टिव्ह कोटिंग करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. असे असतानाही देवस्थान समितीच्या सदस्या खाडे यांनी श्रीपुजक यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यास सुरुवात केली.तसेच कोणताही अभ्यास न करता कोल्हापुरातील संघटनांनी थेट आंदोलन करणे चुकीचे आहे.तीर्थक्षेत्राची अशी बदनामी करणे चुकीचे आहे असेही श्री पूजक श्रीश मुनीश्वर म्हणाले. याच्या निषेधार्थ खाडे यांची देवस्थान समितीमधून खाडे यांची हकालपट्टी करा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे.
या वेळी उपाध्यक्ष श्रीश मुनीश्वर, सचिव माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर,ऐश्वर्या मुनीश्वर उपस्थित होते.

Leave a Reply