लाभांकुर कचरा कुंडिमुळे कचऱ्याचा प्रश्न सुटेल

 

कोल्हापूर :आज कोल्हापुरात घन कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. याच पार्श्व भुमीवर माझ घर – माझ कोल्हापूर-स्वच्छ,सुंदर आरोग्यदायी कोल्हापूर’ ही संकल्पनेच्या पूर्ततेसाठी युवक मित्र मंडळ हे सन २०११ पासून लाभांकुर कचरा कुंडीची निर्मिती करून घरातच खत बनवण्याची सोय उपलब्ध करून देत आहे. कोल्हापूर शहरात ३ हजार ३८६ लोक या कुंड्या वापरतात. वेळेसोबत यात बदल करत या कुंड्या सर्वसामन्यांसाठी अल्पदरात लोकांना विकण्यात येते. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबा इंदुलकर यांनी आज(रविवार) पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, २००९ साली गणपती देखाव्यात या संकल्पनेची सुरवात झाली. त्यानंतर यावर संशोधन सुरु झाले.२०११ साली पहिली लाभांकुर मातीची कचराकुंडी तयार करण्यात आली. वेळेबरोबर नवनवीन संशोधन करत या कुंडीत बदल करत प्लास्टिक बकेट आणि आता प्लास्टिक पाईपच्या या कुंड्या बनवण्यात येत आहेत. या कुंड्याच्या सहाय्याने घरातील कच-यापासून खत निर्मिती होते. आता पर्यंत ५०० किलोहून अधिक खताची निर्मिती या कुंड्यांच्या माध्यमातून झाली आहे. महापालिकेच्या कचरा निचा-याच्या खर्चातील २७ लाख रुपयांची बचत या कुंड्यामुळे झाली आहे.
आता ज्या कुंड्या बनवल्या आहेत त्या प्लास्टिक पीव्हीसी पाईपच्या आहेत या पाईप जमिनीत खड्डा काढून त्यात ठेवायचा आणि त्यात कचरा टाकायचा. ४५ दिवसात या पाईपमध्ये सुमारे अडीच ते तीन किलो सेंद्रिय खत तयार होते. ते खत मंडळच्या वतीने १५ रूपये किलो या दराने खरेदी करण्यात येते. या कच-याच्या खत निर्मिती प्रक्रियेत लागणारी रसायने हे मंडळ मोफत पुरवते. या मंडळामार्फत नाना-नाणी पार्क, हनुमान नगर येथे मोफत कुंड्या बसवण्यात आल्या असून तेथील कच-यापासून आत्तापर्यंत ४५० किलो खताची निर्मिती झाली आहे. या कुंड्या ११०० ते १२०० किंमतीच्या आहेत. हे मंडळ पूर्वीपासून स्वत: महाग कुंडी खरेदी करून त्या लोकांना अल्पदरात कुंडी देतात. या मंडळाचे एकच स्वप्न आहे ते म्हणजे स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर. कोल्हापूर शहरातील रस्त्या कडेला कच-याचे पडलेले ढीग संपवणे हे उद्दिष्ट ठेवून हे मंडळ काम करत आहे.
या मंडळाच्या कामाची दखल घेत आता पर्यंत या मंडळाला गणराया अॅवार्ड, लोकसत्ता, तरूण भारत, सकाळ,एसपीएन,लायन्स क्लब, झी मराठी, माणिकचंद अॅवार्डने गौरविण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे सभासद किशोर मळेकर आणि चंद्रशेखर निकम हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!