
कोल्हापूर: शेतकरी संपाच्या धर्तीवर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली.संपूर्ण कोल्हापूर शहरात आज कडकडीत बंद ठेवण्यात आला.व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन आपला उस्फुर्त सहभाग दर्शविला. तसेच बाजार समितीतून भाज्यांची आवक घटली.शहरातील सर्व भाजी मंडई आज बंद ठेवण्यात आल्या.गोकुळ दुध संघाने आज दुध वितरण बंद ठेवल्याने दुधाची टंचाई आज दिवसभर होती.११ लाख लिटर दुध वितरण आज थांबविण्यात आले.इचलकरंजी येथील रुई गावातील महिलांनी कर्जमाफीसाठी रास्ता रोको केले.पेठ वडगाव येथे अडत दुकानाला टाळेबंदी करण्यात आली.संपूर्ण जिल्ह्यात बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
Leave a Reply