
कोल्हापूर: शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने शिये इथे रास्ता रोको करण्यात आला.पुणे बेंगलोर महामार्गावर शिये फाटा येथे सकाळी १० वाजता हा रास्ता रोको करण्यात आले.आमदार डॉ.सुजित मिणचेकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.शिवसेना सत्तेत असूनही सरकारच्या या दादागिरीचा निषेध करत आहे.प्रचंड पोलीस बंदोबस्तात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आणि त्याच्यावरच ही आंदोलन करण्याची वेळ या भाजप सरकारने आणली आहे.त्यामुळेच संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Leave a Reply