
कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या संपात रडारवर आहेत.सत्तेत गेल्यावर भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीय.त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली.असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.गेले 5 दिवस सुरु असलेल्या संपात काही ठिकाणी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले गेले.तर काही ठिकाणी प्रतीकात्मक अंतयात्रा काढून निषेध करण्यात आला.कृषीमंत्री सदाभाऊ खोत हे पहिले तीन दिवस काही बोलले नाहीत.पण सत्तेत राहून मुख्यमंत्री यांच्याशी शेतकऱ्यांच्या हितासाठी चर्चा करण्याचे सोडून संपात फुट पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.म्हणूनच आधी मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत आता सदाभाऊ खोत हे ही शेतकऱ्यांच्या हिटलिस्टवर आहेत अस म्हणणे वावगे ठरणार नाही.
Leave a Reply