
कोल्हापूर– सीपीआर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने मुंबई हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आदी विकसित रुग्नालायांप्रमाने इंटरनल कनेक्टीव्हिटी प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीने पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, सीपीआर रुग्णालयातील अनधिकृत अतिक्रमण येत्या १५ दिवसात काढावे, रिक्त पदांचा अहवाल पुन्हा शासनाकडे सादर करावा, ठेके वितरण कामाच्या प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पार पाडाव्यात, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर अभ्यागत समितीच्या बैठकीमध्ये प्रशासनास दिल्या. या बैठकीस आमदार अमल महाडिक उपस्थित होते. या बैठकीच्या सुरवातीस बैठकीचे विषय मांडताना डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी, प्रशस्त आयसीयू विभागाचे थोडेफार काम बाकी असून येत्या शनिवारपर्यंत सदर काम पूर्ण होईल. शेंडा पार्क रुग्णालय येथे १४ इमारती असून त्यापैकी चार इमारतींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्ध झाला आहे. चार इमारतींच्या कामांचे टेंडर प्रोसेस चालू असून उर्वरित चार इमारतींचे काम सुरु करण्याची प्रक्रिया अजून स्थानिक पातळीवर आहे. सीपीआर रुग्णालयातील साफ सफाईच्या ठेक्यावर पुढील आठवड्यामध्ये निर्णय शक्य असून, यासह वस्त्रधुलाई, विद्धूत संच देखभाल, सांडपाणी प्रकल्प, कॅटीन असे आठ कामे ठेका पद्धतीने देण्याकरिता निविदा काढण्यात येणार आहेत. यातील तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरच या कामास सुरवात करण्यात येईल. अशी माहिती दिली.यावर बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ठेका पद्धतीची कामे पूर्णतः कायदेशीर बाबी पूर्ण करून करण्यात यावी. या ठेका पद्धीतीच्या कामाची संपूर्ण जबाबदारी सीपीआर प्रशासनाची असल्याने ठेकेदारावर अंकुश ठेऊन तंतोतंत कामाची अमलबजावणी व्हावी, अशी सुचना केली. त्याचबरोबर सीपीआर मधील अनधिकृत अतिक्रमनाबाबत अधिकार्यांना धारेवर धरत अतिक्रमण करणार्याना लाईट वीज कशी मिळते अशी विचारणा केली. यावर अधिकारी निरुत्तर झाले. सदर अतिक्रमणे येत्या १५ दिवसात काढून घ्यावी अशा सूचनाही अधिकार्यांना दिल्या. याबाबत बोलताना आमदार अमल महाडिक यांनी, अतिक्रमण करणार्याबाबत हयगय न करता त्यांच्यावर कारवाई करा, असे सूचित केले.बैठकीमध्ये सी.पी.आर. रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत, जमा झालेल्या निधीच्या विनियोगाबाबत, सी.पी.आर रुग्णालयातील अतिक्रमण काढण्याबाबत, सिटी स्कॅन आणि ट्रामा केअर सेंटर च्या उद्घाटनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सी.पी.आर मधील रिक्त पदांचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा आणि त्याची प्रत लोकप्रतिनिधीना द्यावी जेणे करून शासनाकडे पाठपुरावा होईल, अतिक्रमण लवकरात लवकर काढावे आणि सिटी स्कॅन आणि ट्रामा केअर सेंटर च्या उद्घाटनाबाबत मा. पालकमंत्री महोदायाची वेळ घेऊन सदर विभाग लवकरात लवकर रुग्णाच्या सेवेसाठी सुरु करावेत अशा सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. यावेळी डीन डॉ. रामानंद यांनी, सीव्हीटीसी विभाग जुन्या झालेल्या मशीनद्वारे चालविणे मुश्कील झाल्याचे सांगितले. यावर नवीन मशनरी करिता येणारा खर्च जीवनदायी योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून वापरण्याबाबत चर्चा झाली. परंतु जीवनदायी योजनेतून मिळणारे पैसे फक्त औषधासाठी वापरणे बंधनकारक असल्याची माहिती डॉ. रामानंद यांनी दिली. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जीवनदायी योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. वाघ याना, या योजनेतून मशनरी खरेदी करण्याकरिता निधी खर्च करण्याची परवानगी मिळणेबाबत प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सुचना दिल्या. यासह येत्या १५ दिवसांमध्ये जीवनदायी योजनेशी संबधित रुग्णालयांच्या अडचणीची बैठक मा.आरोग्यमंत्री महोदय यांच्यासोबत आयोजित करू, असे सांगितले.
यानंतर आमदार राजेक्ष क्षीरसागर यांनी, मुंबई हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल आदी सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआर रुग्णालयामध्ये इंटरनल कनेक्टीव्हिटी प्रणालीचा वापर करून रुग्णसेवा गतिमान करण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सुचना दिल्या. यावर डॉ. रामानंद यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांद्वारे हि प्रक्रिया राबविणे शक्य असल्याचे सांगितले. त्याचा लवकरच अहवाल तयार करून पुढील बैठकीत सादर केला जाईल, असे सांगितले
Leave a Reply