कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन केले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणत संपन्न करण्याच्या दृष्टीने शिवसेना शाखा आपआपल्या भागामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करणार आहेत. यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता समस्त शिवसैनिक उद्या दि.०६ जून २०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता ऐतिहासिक “छ. शिवाजी चौक, कोल्हापूर” येथे जमणार आहेत.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानंतर शिवसेनेच्या वतीने छ. शिवरायाना वंदन करण्यात येणार आहे. यावेळी महिलांच्या लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्याचबरोबर राज्याभिषेक झाल्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. या सोहळ्यास समस्त हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि करवीर वासियांनी उपस्थित राहून, छ. शिवरायांना वंदन करावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Leave a Reply