शिवसेनेच्या वतीने “राज्याभिषेक सोहळा” उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर:महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी छ. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आयोजन करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणत संपन्न करण्याच्या दृष्टीने शहरातील शिवसेना शाखानी आपआपल्या भागामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करून छ. शिवरायांना अभिवादन केले. यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता समस्त शिवसैनिक ऐतिहासिक “छ. शिवाजी चौक, कोल्हापूर” येथे जमले.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन होऊन छ. शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने छ. शिवरायाना वंदन करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हर हर महादेव”, “छ. शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी छ. शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.
यावेळी महिलांच्या लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक झाले. या पथकामध्ये सहभागी लहान मुली आणि मुलांनी विविध प्रत्याक्षिकांनी उपस्थितांची मने जिकली. या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छ. शिवाजी चौक परिसरात भव्य आतषबाजी करण्यात आली. तसेच शिवसैनिकांनी साखर- पेठे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, माजी उपमहापौर उदय पवार, जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, बजरंग दलचे बंडा साळुंखे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हरुगले, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, रमेश खाडे, रणजीत जाधव, पद्माकर कापसे, सनी अतिग्रे, शाम जाधव, युवासेना शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, सागर घोरपडे, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, कपिल केसरकर, महिला आघाडीच्या सौ.पूजा भोर, गौरी माळदकर, अजित गायकवाड, सुनील खोत, गजानन भुर्के, विशाल देवकुळे, रणजीत सासणे, दिनेश साळोखे, राज कापसे, सुरेश कदम, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!