समीर गायकवाड़ ची पुढील सुनावणी 16 जूनला

 

कोल्हापूर :ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्येच्या कटात आरोपी समीर गायकवाडच्या सहभागाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष एकही ठोस पुरावा ‘एसआयटी’कडे उपलब्ध नसताना नाहक अटक करून वीस महिने त्याला कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. हा प्रकार नैसर्गिक न्यायाविरुध्द आहे. हत्येच्या कटाशी त्याचा  काही संबंध नाही. सर… समीर निर्दोष आहे. त्याचा मूलभूत हक्क हिराविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने त्याचा जामीन अर्ज मंजूर व्हावा. असा युक्तीवाद आरोपीचे वकिल समीर पटवर्धन यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. पाच तासाहून अधिककाळ झालेल्या युक्तीवादात वकिल पटवर्धन यांनी तपास यंत्रणेला टिकेचे लक्ष केले.

कॉ.पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेल्या समीरच्यावतीने वकिल समीर पटवर्धन यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधिश एल.डी.बिले यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. समीरच्या अर्जावर हरकत घेवून सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकिल हर्षद निंबाळकर, सहाय्यक सरकारी वकिल शिवाजीराव राणे यांनी लेखी म्हणणे यापुर्वीच सादर केले आहे. आरोपीवतीने वकिल पटवर्धन व वीरेंद्र इंचलकरंजीकर यांनी युक्तिवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!