
कोल्हापूर : पत्रकारिता मजबूत व्हावी पत्रकारांनी ट्वीस्ट करणे थांबवले पाहिजे. विकासकामांचे प्रयोग छापावे तोच तोच पणा दाखवला जातो किंवा छापला जातो. समाजव्यवस्था नीट चालण्यासाठी पत्रकारिता नीट चालली पाहिजे. खरे ते खरे आणि खोटे ते खोटे दाखवले पाहिजे. असे मत पालकमंत्री चंदकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि कोल्हापूर जिल्हा वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विघमाने आज शाहू स्मारक येथे पत्रकार संरक्षण कायदा जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. पत्रकार संरक्षण कायदा राज्य सरकारने संमत केला असून याचा फायदा नक्कीच त्यांना होणार आहे. राजकीय माणूस पत्रकारांना खूप घाबरतो त्यामुळे इतकी वर्ष राजकीय नेत्यांच्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी दुमत होते. तसेच पत्रकार याचा गैरवापर करतील या गैरसमजामुळे हा कायदा प्रलंबित होता पण राज्यातील सर्व पत्रकार संघटना एकत्रित येवून त्यांच्या रेट्यामुळेच हा कायदा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी संमत केला आहे. पत्रकारांना राज्य शासनाने नेहमीच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील ५३ टोलनाक्यावर पत्रकारांना सूट दिली आहे. एमएसआरडीसीच्या तोल नाक्यावर सूट देण्यासाठी मी केंद्रशासनाशी बोलणार आहे. पत्रकार भवन याबाबत बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, आदर्श घोटाळा यामुळे राज्यसरकारने कोणत्याही प्रकारची जागा वाटप बंद केले असून पत्रकार भवनसाठी सरकारकडून जागा मिळणे जरी अशक्य असले तरी पत्रकारांनी स्वत: एखादी खाजगी जागा उपलब्ध केल्यास संपूर्ण भवनाचा बांधकाम खर्च देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पत्रकार पेंशनबाबत ठोस भूमिका जरी चंद्रकांत दादांनी स्पष्ट केली नसली तरी पत्रकार विमा यासाठी पत्रकारांना मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मी नेहमी पत्रकारांचा बाजूने आहे. पण पत्रकारांनी आपली प्रतिमा सांभाळणे गरजेचे आहे असे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्यासह चारुदत्त जोशी, समीर देशपांडे, संचालक, पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.
Leave a Reply